सांगली -वाळवा तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू ( Leopard Died In Sangli ) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्वे आणि इटकरे या दोन गावात दोन नर बिबट्यांचा हा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. एका बिबट्याचा विहिरीत ( Leopard Fall Down In Well In Sangli ) पडून मृत्यू झाला आहे, तर दुसरा बिबटया रस्त्याच्या कडेला एका शेतात मृतावस्थेत ( Leopard Found Dead At Sangli ) आढळून आला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
वाळवा तालुक्यामध्ये एकाच वेळी दोन नर बिबटे ठारवाळवा तालुक्यामध्ये एकाच वेळी दोन नर जातीच्या बिबट्यांचा मृत्यू ( Leopard Died In Sangli ) झाल्याची घटना समोर आली आहे. कार्वे याठिकाणी एका शेतातल्या विहिरीमध्ये पडल्याने पाण्यात बुडून सहा महिन्याच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गावातील महादेव माळी यांच्या शेतातील विहिरीमध्ये हा बिबट्या पडून मृत्यूमुखी पडला आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना तो विह्रीत पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.