सांगली- तासगाव तालुक्यातील विसापूर-तासगाव रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड लुटण्याचा प्रकार घडला आहे. दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांच्या टोळीने बँक अधिकाऱ्यांना मारहाण करून २५ लाखांची रोकड लंपास केली आहे.
डोळ्यात चटणी फेकून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची २५ लाखांची रोकड लुटली - बँक
दुपारी १२च्या सुमारास भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
जिल्हा मध्यवर्तीच्या तासगाव शाखेतून अधिकारी २५ लाखांची रोकड घेवून दुचाकीवरून विसापूर शाखेत निघाले होते. तासगाव विसापूर रस्त्यावर २ दुचाकीवरून आलेल्या चौघाजणांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवत डोळ्यात चटणी फेकून कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याजवळ असणारी २५ लाखांची रोकड लुटली. दुपारी १२च्या सुमारास भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे .तर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.