महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tushar Gandhi : अजान-हनुमान चालीसाने भुकेचे प्रश्न सुटणार नाही - तुषार गांधी - तुषार गांधी मशिदीवरील अजान

हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) म्हणल्याने किंवा मशिदीवरील अजानने ( Azaan Controversy ) लोकांच्या भुकेचा प्रश्न सुटणार नाही. केवळ लक्ष विचलित करण्यासाठी सर्व सुरू असल्याचा आरोप, तुषार गांधी ( Tushar Gandhi ) यांनी केला आहे.

Tushar Gandhi
Tushar Gandhi

By

Published : Apr 24, 2022, 5:50 PM IST

सांगली -सध्याचे राजकारणी विदूषकाप्रमाणे वर्तन करत आहेत. गैरसमज करून द्वेष पसरवला तरंच मतदान मिळते, असा समज सर्व राजकारण्यांना झाला आहे. हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) म्हणल्याने किंवा मशिदीवरील अजानने ( Azaan Controversy ) लोकांच्या भुकेचा प्रश्न सुटणार नाही. केवळ लक्ष विचलित करण्यासाठी सर्व सुरू असल्याचा आरोप महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी ( Tushar Gandhi ) यांनी केला आहे. ते मिरजेत बोलत होते.

तुषार गांधी म्हणाले, देशात सध्या दुर्दैवाने द्वेषाचे राजकारण यशस्वी होत आहे. सत्याच्या मार्गाने गेल्यास मतदान मिळणार नाही. गैरसमज करून, द्वेष पसरवला तरच मतदान मिळत, असा समज सर्वच राजकारण्यांचा झाला आहे. तसेच, आत्ताचे सर्व राजकारणी विदूषकाप्रमाणे आपले वर्तन करत आहेत, अशी टीकाही तुषार गांधींनी केली आहे.

तुषार गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

मग, पुन्हा भगतसिंग का घडले नाहीत ? - शहीद भगतसिंग यांच्या नंतर परत दुसरा भगतसिंग का झाले नाही ?. कारण भगतसिंग यांच्या बलिदानाची किंमत त्यावेळच्या लोकांना कळली नाही. लोकांनी गद्दारी केली, भगतसिंग यांच्या बलिदानाला धोका दिला. भगतसिंग यांच्या अभिप्रेत असलेल्या विचारावर तरुणांनी वाटचाल केली असती. तर, अगोदरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते. स्वातंत्र्यासाठी काही योगदान न दिलेली लोक स्वातंत्र्य फुकट मिळाले आहे, असा अपप्रचार करत आहेत, असे परखड तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

मस्जिद विरुद्ध हनुमान चालीसा -आत्ताची काँग्रेस निवडणूक केंद्री आहे. पूर्वीची काँग्रेस स्वातंत्र्य संग्रामाच्या विचारधारेवरची होती. त्यामुळे आताची काँग्रेस आणि पूर्वीच्या काँग्रेसमध्ये तुलना करणे योग्य होणार नाही. हनुमान चालीसा म्हणाल्याने किंवा मशिदीवर स्पीकरने अजान दिल्याने लोकांच्या भुकेचा प्रश्न सुटणार नाही. मात्र, भुकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी मस्जिद विरुद्ध हनुमान, असे चित्र निर्माण केले जात आहे, असा आरोपही तुषार गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा -Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

ABOUT THE AUTHOR

...view details