महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात गरजुंच्या मदतीसाठी सरसावणारे 'तुकाराम महाराज' - कोरोना मदत

सांगलीच्या जत तालुक्यातील चिखलगी भुयारी मठाधिपती व मानवता विकास सेवा संस्थेचे तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या संकटात समाजातील अध्यात्मिक महाराज, बाबा यांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे.

तुकाराम महाराज
तुकाराम महाराज

By

Published : Jul 12, 2021, 7:29 PM IST

Updated : Jul 12, 2021, 8:07 PM IST

सांगली -दान, धर्म घेऊन जगणारे अनेक ढोंगी बाबा, महाराज आज समाजात ठिक ठिकाणी आढळतात. परंतु जत तालुक्यातील एक महाराज कोरोनाच्या संकटात गेल्या दीड वर्षांपासून गोरगरिबांना मदतीचा हात देत आहे. आतापर्यंत 371 टन भाजीपाला, 57 टन धान्य, रेशन किट, आर्थिक मदत अशा अनेक पातळ्यांवर अहोरात्र मदत करत आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदती न घेता स्वखर्चाने संत गाडगेबाबा यांच्या विचारातुन चिखलगी भुयारी मठाचे तुकाराम महाराज हे कार्य करत आहेत.

गरजुंच्या मदतीसाठी सरसावणारे 'तुकाराम महाराज'
गाडगे आणि बागडे महाराजांची प्रेरणा

समाजात आज बाबा, महाराज यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ढोंगी बाबा, महाराज अनेकदा आपल्याला पाहायला देखील मिळतात. वास्तविक बाबा असो किंवा महाराज हे आध्यत्मिक काम करणारे समाजातुन मिळणाऱ्या दान-धर्म, देणगी यावर आपली गुजारण करतात. मात्र सांगलीच्या जत तालुक्यातील चिखलगी भुयारी मठाधिपती व मानवता विकास सेवा संस्थेचे तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या संकटात समाजातील अध्यात्मिक महाराज, बाबा यांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. तुकाराम बाबा यांनी संत गाडगेबाबा आणि त्यांचे शिष्य बागडे महाराज यांच्या प्रेरणेतुन समाजसेवेचा व्रत हाती घेत अखंडपणे तो जोपासण्याचे काम करत आहेत.

स्वखर्चांने गोरगरिबांना मदतीचा हात

गेल्या दीड वर्षांपासून तुकाराम महाराज आपल्या भक्तांच्या समवेत समाजातील गोर गरीब गरजूंना वेगवेगळ्या पातळीवर मदतीचा हात दिला आहे. मग तो भाजीपाला असो, धान्य असो किंवा अन्य साधन सामग्री मदत असो, अहोरात्र ती मदत पुरवण्याचे काम आजही सुरू आहे. जवळपास आत्तापर्यंत जत तालुक्यात 371 टन भाजीपाला, त्याशिवाय 57 टन धान्य आणि हजारोच्या संख्येने सॅनिटायझर, मास्क याशिवाय आर्थिक स्वरूपाची मदत देखील तुकाराम महाराजांनी केली आहे. तालुक्याबरोबर सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील गरजूंसाठीही तुकाराम महाराज हे आता धावून जात आहेत. विशेष म्हणजे ही मदत समाजातून कोणत्याही प्रकारची देणगी, दान न घेता स्वतःच्या काही व्यवसायातल्या मिळणाऱ्या नफ्यातून ही मदत करत असल्याचे तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे.

'हे तर चालता-बोलता देव पूजाण्याचे काम'

तुकाराम महाराज म्हणतात, वेगवेगळ्या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणीना सामोरे जावे लागते. आज आपण समाजात काम करत असताना या समाजाचे कुठेतरी देणे लागतो. यामुळे संत गाडगेबाबा महाराज आणि त्यांचे शिष्य बागडे महाराज यांच्या प्रेरणेतून समाजाला मदतीचा हात देण्याचे काम आपण सुरू केले. चालता-बोलत देव पूजा हा गाडगे बाबा आणि बागडे बाबांचा मंत्र आहे. त्यानुसार आपण हे काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया तुकाराम महाराजांनी दिली आहे. आज अनेकजण देऊळ बनण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण आपण देऊळ बांधण्याऐवजी आधी लोकांना मदत केली पाहिजे, गोरगरिबांना मदत केली पाहिजे, अशी भावना तुकाराम महाराज यांनी बोलून दाखविली आहे.

Last Updated : Jul 12, 2021, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details