सांगली - येथील सांगली-कोल्हापूर मार्गावरील जयसिंगपूरमध्ये गुरुवार दुपारपासून वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे.
पूर ओसरल्याने व रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे सांगली-कोल्हापूर मार्गावर ट्रॅफिक जाम... - सांगली पूर
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातला पूर ओसरल्यामुळे आणि आज 15 ऑगस्ट रक्षाबंधन सणामुळे या मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल पूर ओसरल्यामुळे आणि आज 15 ऑगस्ट रक्षाबंधन सणामुळे या मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. जयसिंगपूर ते अंकली दरम्यान अरुंद असणारा रस्ता, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे. त्यामुळे दुपारपासूनच जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी मार्गावरील वाहतूक हळूहळू पुढे सरकत आहे. तर, उदगाव नजीकच्या टोल नाक्याजवळचा कोल्हापूरकडे जाणार बायपास अजुनही पाण्याखाली असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी अद्याप खुला झाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम याठिकाणी दिसून येत आहे.