सांगली - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कोंबड्या आणि अंडी फेकण्यात आली आहेत. ताकारी ते कुंडल मार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत अनोखे आंदोलन केले. कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याप्रकरणी कारवाईसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून गनिमी काव्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.
'स्वाभिमानी'कडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या व अंडी
सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतील वाहनांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आला. ताकारी ते कुंडल या मार्गावरील दह्यारी फाट्यानजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन गनिमी काव्याने ताफ्यासमोर येत अंडी आणि कडकनाथ कोंबड्या फेकल्या.

अचानकपणे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर येऊन वाहनाच्या ताफा रोखून अंडे आणि कोंबड्या फेकल्याने पोलीस यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी. तसेच सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी द्यावे आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
TAGGED:
mahajanapadas yatra sangali