सांगली- शहरानजीकच्या आष्टा येथे गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात ३ युवक ठार झाले आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.
ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 तरुण ठार, आष्टा नजीकची घटना - truck
सांगलीजीकच्या आष्टा येथे गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात ३ युवक ठार झाले आहेत.
सांगलीच्या आष्टा येथील तासगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघालेले तीन जिवलग मित्र अपघातामध्ये ठार झाले आहेत, दुचाकीवरुन निघालेले या तरुणांची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली आणि भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रवीण अशोक सुर्यवंशी (वय २८ वर्षे), अनिकेत आकाश माळी (वय २८ वर्षे), सुमित संजय पाटील-पोखरणीकर, अशी अपघातातील मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
तासगाव रोडवरील महावितरण कार्यालयासमोर हा अपघात झाला आहे. भिलवडीकडून गॅस सिलेंडर भरून येणारा ट्रक आणि दुचाकीमध्ये हा अपघात घडला. यावेळी ट्रकची आणि दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. ज्यामध्ये प्रवीण व अनिकेत रस्त्यावर पडले. तर सुमित हा रस्त्याकडेला फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रवीण व अनिकेत जाग्यावरच मृत झाले. तर अत्यवस्थ स्थितीत सुमित याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सुमित व प्रवीण हे एमबीए झाले असून अनिकेतचे इंजिनेअरिंग पूर्ण झाले आहे. यांच्या मृत्यूमुळे बावची गावावर शोककळा पसरली आहे.