सांगली - इस्लामपूर प्रांताधिकारी यांच्याकडून तीन तलाठ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघाकडून करण्यात आला आहे.या मारहाण प्रकरणी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. बुधवारी कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील तलाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूरचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी पूर्वग्रह दोषातून तीन तलाठ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने केला आहे. अविनाश पाटील, अमर साळुंखे आणि महादेव वंजारी या तीन तलाठ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना कार्यालयात बोलावून घेतले आणि शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघांच्या सांगली विभागाने केला आहे. तलाठी संघातफे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदनाद्वारे प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -गोरेगाव येथील भीषण आगीवर तब्बल अकरा तासानंतर नियंत्रण