सांगली- सुवर्ण कारागिराचे दुकान फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्याकडून जवळपास चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सराफा दुकान फोडणारी टोळी गजाआड, पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त - police
सांगलीमधील विटा येथे सूर्या आर्ट्स नावाचे सुवर्ण कारागीराचे दुकान आहे. गेल्या १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. तसेच २ लाख ४० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
सांगलीमधील विटा येथे सूर्या आर्ट्स नावाचे सुवर्ण कारागीराचे दुकान आहे. गेल्या १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. तसेच २ लाख ४० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा उध्वस्त करण्यात आली होती. यामुळे शहरातील सराफा बाजारात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सराफा व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच या चोरीचा छडा लावणे विटा पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान होते. अखेर विटा पोलिसांनी या चोरीचा तपास करत अवघ्या ३ दिवसांत चोरीचा उलगडा केला आहे.
चोरीप्रकरणी अमोल शहाजी शिरतोडे, आनंदा गणपत आडके, राजेंद्र रामचंद्र मोहिते, संतोष भिमराव जावीर या सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून चोरीत लुटण्यात आलेला पावणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.