सांगली- रुग्णालयाच्या खर्चाचे ऑडिट करण्यासाठी सरकारने ऑडिटर नेमले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कार्यप्रणालीचे ऑडिट करण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. राज्यात विशेष करून सांगली जिह्याचा मृत्यूदर कमी का होत नाही, या प्रश्नावर पाटील यांनी हे मत व्यक्त केले.
सांगलीमध्ये एका कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील आले होते. राज्याबरोबरच सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देश आणि राज्यापेक्षा सांगलीतला मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना जिल्ह्यात आणि राज्यात रुग्णांच्या उपचारानंतर बिलांबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे, राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांच्या रुग्णालय बिलांचे ऑडिट करण्याची भूमिका घेण्यात आली.