महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कोरोना रुग्ण संख्येची उच्चांकी नोंद, पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन - कोरोना रुग्णसंख्या सांगली

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 1 हजार 833 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संख्या आहे.

corona patients in sangli
corona patients in sangli

By

Published : May 6, 2021, 5:27 AM IST

सांगली -सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 1 हजार 833 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संख्या आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटलांनी चिंता व्यक्त करत बुधवारपासून लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी -

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात ऑक्सिजन, बेड आणि रेमडीसीवरचा तुटवटा निर्माण होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी बुधवार 5 मे रात्री 8 वाजल्यापासून आठ दिवस जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. ज्यामध्ये केवळ ७ ते ९ दूध विक्री सुरू असणारा आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुकाने, भाजीपाला विक्री या शिवाय एसटी वाहतूक बंद राहणार आहे.

मंत्री जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन -

दरम्यान बुधवारी सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी नोंद झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 1 हजार 833 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील ही उच्चांकी रुग्ण संख्या आहे. तर या रुग्ण संख्येबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त करत सांगलीकर बंधू-भगिनींनो, आज सांगली जिल्ह्यात १८३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही आजपर्यंतची उच्चांक गाठणारी रुग्ण संख्या आहे. ही शृंखला मोडणे गरजेचे आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनला प्रतिसाद द्या. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करा. घरीच रहा, सुरक्षित रहा ! असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details