महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2019, 9:01 PM IST

ETV Bharat / state

सांगोला-जत मार्गावर स्विफ्ट कार व ऑटो रिक्षाचा अपघात, 2 गंभीर

सांगोला जत रोड वरील सांगोल्या पासून ३ किलोमीटर अंतरावर खारवट वाडी जवळ स्विफ्ट कार आणि रिक्षामध्ये अपघात झाला आहे. या अपघातात दोघेजन जखमी झाले आहेत.

स्विफ्टकार व ऑटो रिक्षाचा अपघात 2 गंभीर जखमी

सांगली -सांगोला जत रोडवरील खारवटवाडी जवळ दुपारी 2 च्या सुमारास सोनंद हुन निघालेली स्विफ्ट कार व सांगोल्या हुन निघालेली (MH 10 s 9590) प्रवासी रिक्षा यांचा अपघात झाला. अपघातात प्रवासी ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्विफ्टकार व ऑटो रिक्षाचा अपघात 2 गंभीर जखमी

सांगोला जत रोडवरील सांगोल्यापासून 3 किलोमीटर अंतरावरील खारवटवाडी जवळ दुपारी 2 च्या सुमारास सोनंदहून निघालेली स्विफ्ट कार व सांगोल्याहून निघालेली (MH 10 s 9590) प्रवाशी रिक्षा यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की प्रवाशांची रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षा तील चार प्रवाशांसह स्विफ्ट कार मधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये स्विफ्ट कार मधील एक संजय केदार (वय 30 राहणार वासूद अकोला) व रिक्षा मधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातामध्ये रिक्षा ड्रायव्हर सिद्धेश्वर ज्ञानेश्वर गरंडे (वय 35 राहणार तरंगेवाडी), सविता बाबुराव अनुसे (वय 45 रा कडलास), तानाजी रामचंद्र पारेकर (वय 35 रा तरंगेवाडी), किसनाबाई दत्तू वाघमारे (वय 50 नराळे), यास्मिन बागवान (राहणार जवळा) ओंकार चौगुले (वय 27 राहणार सांगोला), संजय केदार (वय 30 राहणार वासुद अकोला) या व्यक्ती जखमी झाल्या आहेत. स्विफ्ट कार मधील संजय केदार व ओंकार चौगुले यांना उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले आहे. इतर जखमींना सांगोला शहरातील डॉक्टर गवळी यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रिक्षा ड्रायव्हर सिद्धेश्वर गरंडे यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details