महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आबांचा गड राखण्यासाठी पत्नी सुमनताई पाटील मैदानात; शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला व दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळमधून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

By

Published : Oct 3, 2019, 8:21 PM IST

Updated : Oct 3, 2019, 8:44 PM IST

सुमनताई पाटील

सांगली - तासगाव-कवठेमहाकाळ मतदारसंघातून आर. आर. पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात सुमनताई पाटील यांना शिवसेनेचे उमेदवार अजित घोरपडे यांचे आव्हान राहणार आहे.

आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा -भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला व दिवंगत माजी गृहमंत्री पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळमधून पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आज(गुरुवार) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार सुमनताई पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आपली उमेदवारी दाखल केली आहे. तासगाव शहरातून कार्यकर्त्यांसह रॅलीद्वारे येऊन त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

Last Updated : Oct 3, 2019, 8:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details