सांगली -जिल्ह्यातील एका एसटी कर्मचाऱ्यांचा( ST Worker Death) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राजेंद्र पाटील, (वय 47) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिरज(miraj) तालुक्यातील कवलापूर याठिकाणी राहत्या घरामध्ये राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण (Merger of ST) करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. सांगलीतही गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. आता या संपावर असणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र निवृत्ती पाटील, वय 47 असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील हे सांगली आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होते. मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी राहत्या घरी राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
'या' कारणामुळे राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पूर असो की नैसर्गिक आपत्ती, कोरोनाची महामारी की, निवडणुकीची धामधूम, यामध्ये एसटी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे वेळेत होत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. कित्येक कर्मचारी, चालक व वाहक उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकणे, चहाची टपरी चालवणे, मजुरी करणे अशी वेगवेगळी कामे करत आहेत. काही एसटी कर्मचारी शेतमजूर म्हणूनही काम करताना राज्याच्या विविध भागात दिसून आले आहेत. सणासुदीतही कामगारांना वेळेत वेतन मिळत असल्याने कामगार हवालदिल झाले आहे. आज वाढत्या महागाईच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी पडत आहेत. त्यातच घराचे हप्ते, मुलांचा शिक्षणाचा खर्च, किराणा खर्च आदी विविध खर्च भागवणे कर्मचाऱ्याला खूप अवघड जात आहे. सततच्या मानसिक दबावातूनच ते आत्महत्यासारखे (ST Employee Suicide Issue) टोकाचे पाऊल उचलत असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२० ते मे १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
हेही वाचा -ST Workers Meet Raj Thackeray : सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, राज ठाकरेंचे आवाहन