इस्लामपूर (सांगली) -बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी इस्लामपूर ते मंत्रालय बैलगाडी ओढत पदयात्रा काढली आहे. इस्लामपूरमधून या पदयात्रेला सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतीवर गेली 12 वर्षांपासून बंदी घातल्याने नामवंत जातींचे बैल नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. तर तेव्हापासून शेतकरीवर्गाचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे.
बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांची इस्लामपूर ते मंत्रालय पदयात्रा - सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव
बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी इस्लामपूर ते मंत्रालय बैलगाडी ओढत पदयात्रा काढली आहे. इस्लामपूरमधून या पदयात्रेला सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतीवर गेली 12 वर्षांपासून बंदी घातल्याने नामवंत जातींचे बैल नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत.
आतापर्यंत ४२ लाख बैलांची कत्तल झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी सोमवार दि 12 रोजी साखराळे (ता. वाळवा) येथील प्राणी मित्र व सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैलाची प्रतिकृती भेट देण्यासाठी बैलगाडीत बैलाची प्रतिकृती ठेऊन ओढत मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी तीन वाजता इस्लामपूरपासून पदयात्रेस सुरूवात केली आहे.
बैल हा पाळीव प्राणी असताना ही शासनाने जंगली जनावर म्हणून खोटी नोंद केली आहे. वेळोवेळी पुरावे देऊनही बैलाचा पाळीव प्राणी यादीत नाव न घातल्याने व बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच संविधान कलम ४८ नुसार बैल हा जोपणीचा व पाळीव प्राणी आहे. तर जंगली जनावरांच्या यादीमध्ये बैलाचे नाव कशाच्या आधारे घालण्यात आले, याचा जाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारण्यासाठी इस्लामपूर ते मुंबई बैलगाडी ओढत अनवाणी पायाने ४०० किलोमीटर प्रवास जाधव करणार आहेत. 22 जुलै रोजी महाराष्ट्र बेंदूर असल्याने या सणानिमित्त मुख्यमंत्री यांना बैलाची प्रतिकृती भेट देणार असलेचे जाधव यांनी सांगितले तर छोट्या टॅक्टर कंपन्या चालण्यासाठी बैलावर बंदी घातली आहे. मात्र मुख्यमंत्री साहेब बैल हा पाळीव प्राणी आहे. त्या बैलाचा आम्हाला मालक होऊ दे, अशी साद जाधव यांनी मुख्यमंत्री यांना घातला आहे.