सांगली- जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२० झाली आहे. तर आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५३ झाली आहे. यापैकी १२५ जण हे कोरोना मुक्त झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगलीमध्ये ६ कोरोना रुग्णांची भर; एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १२०
सध्या ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२० असून आतापर्यंत १२५ मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी ६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व जण मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. यामध्ये शिराळा तालुक्यातील ३ जण असून खेड, बिळाशी आणि मणदूर येथील ५ महिन्याच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आहे.
खानापूर तालुक्यातील भिकवडी येथील दोन जण, तासगाव तालुक्यात गव्हाण येथील १ जण अशा ६ जणांचा समावेश आहे. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५३ झाली आहे. तर सध्या ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२० असून आतापर्यंत १२५ मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.