सांगली- इस्लामपुरचे आणखी ६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी २२ कोरोना बाधितांपैकी ६ जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना मिरजच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीचा कोरोना आकडा आता १६ वर आला आहे.
इस्लामपूरचे ६ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १० ने घटला - सांगली कोरोना न्यूज
इस्लामपुरचे आणखी ६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी २२ कोरोना बाधितांपैकी ६ जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना मिरजच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीचा कोरोना आकडा आता १६ वर आला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथील कोरोना बाधितांचा आकडा २६ वर होता, तो आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. २६ पैकी मुख्य चौघे दोन दिवसांपूर्वीच बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूट क्वारंटाईन मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित २२ रुग्ण मिरजेच्या रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी आणखी सहा जणांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आले होते. आज सहा जणांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आणखी सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी १९ जणांचे स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. या पैकी सर्व १९ अहवाल निगेटिव्ह आले. ज्या मध्ये ६ कोरोना बाधितांचा समावेश होता. त्यामुळे आता सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा १० ने कमी होऊन १६ वर पोहचला आहे. आज बरे झालेल्या ६ जणांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन शासनाच्या इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.