महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत टाळेबंदीच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारचे घातले 'श्राद्ध' - सांगलीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचे श्राद्ध

कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत कृष्णा नदीच्या काठावर दशक्रिया विधी घालून अनोख्या पध्दतीने सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.

सांगली
सांगली

By

Published : Apr 11, 2021, 6:55 PM IST

सांगली- भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचे श्राद्ध घालत निषेध करण्यात आला. कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत कृष्णा नदीच्या काठावर दशक्रिया विधी घालून अनोख्या पध्दतीने सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.

सांगली

राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या निषेधार्थ सांगली भाजपच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला. भाजप सरचिटणीस दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे महाभाकस तिघाडी सरकार असून या सरकारमुळे जनता भरडली जात आहे, असा आरोप केला. राज्यातील हे सरकार कोरोना काळात पूर्णपणे अपयशी ठरले असून हे सरकार मृत झाले आहे. त्यामुळे या महाभकास तिघाडी सरकारचे भाजपकडून श्राद्ध घालण्यात आले आहे.

शहरातील कृष्णा नदीच्या काठी विधीवत पूजा करत दशक्रिया विधी घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनातून सरकारला सुबुद्धी यावी, असे मत यावेळी सांगली भाजपचे सरचिटणीस दीपक माने यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details