महाराष्ट्र

maharashtra

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

By

Published : Aug 22, 2019, 4:01 PM IST

पूरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने मदतीचा हात दिला आहे. तीन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ३० हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्यांनी केले. सांगलीतून हे मदतीचे वाटप सुरु असून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतकी मदत ते करत आहेत.

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

सांगली -पूरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने मदतीचा हात दिला आहे. तीन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ३० हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्यांनी केले. सांगलीतून हे मदतीचे वाटप सुरु असून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतकी मदत ते करत आहेत.

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. शासकीय मदतीबरोबर अनेक संस्था संघटनाही पुढे आल्या आहेत. यामध्ये नेहमीच कट्टर हिंदुत्वाचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्ताननेही पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत १७ हजार किट वाटण्यात आले असून अजूनही हे किट वाटप सुरू आहे. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार कॅम्पमधून हे किट वाटप केले जात आहे. सांगली शहरातल्या डेक्कन हॉल याठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून किट बनवण्याचे काम सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यासाठी काम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details