सांगली- अभिनेत्री कंगना रणौतच्या पोस्टरची शिवसेनेकडून गाढवावरून धिंड काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई पोलिसांचे बदनामी केल्याच्या निषेधार्थ सांगलीच्या मिरजमध्ये शिवसैनिकांनी कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरची गाढवावरून धिंड काढून दहन केले आहे.
अभिनेत्री कंगना रणौतकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी उल्लेख आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व पाकसह तुलना करण्यात आली होती. त्यांनतर कंगनाकडून वारंवार आक्षेपार्ह विधान करण्यात येत आहेत,असा आरोप करत सांगलीच्या मिरजमध्ये शिवसैनिकांकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.