सांगली - एकीकडे तरुण पिढी गुलाबी 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करत असताना सांगलीत हुतात्मा जवानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला. सांगलीच्या 'सोशल वर्कर फोऊंडेशनच्या'वतीने हा अनोखा 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात आला.
हुतात्मा जवानांवर प्रेम करण्याचा संदेश देत सांगलीत 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा - सांगली
सोशल वर्कर फाउंडेशनने व्हॅलंटाईन डेचे औचित्य साधून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा जवानांच्या आठवणी जागवल्या.
१४ फेब्रुवारी म्हणजे सर्वत्र व्हॅलंटाईन्स डे म्हणून साजरा होतो. या दिवशी फक्त तरुण आणि तरुणी एकमेकांना फुले देऊन आपले प्रेम व्यक्त करतात, अशीच या दिवसाची ओळख म्हणावी लागेल. या दिवसाचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी गैरप्रकार, मारामाऱ्या, तरुणींवर हल्ले असे प्रकार घडलेले आपण पाहिले आहे. अशा स्थितीत सांगलीच्या सोशल वर्कर फाउंडेशनने व्हॅलंटाईन डे चे औचित्य साधून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा जवानांच्या आठवणी जागृत करण्याचे ठरवले.
९ वर्षापूर्वी हा हुतात्मा जवानांचा व्हॅलंटाईन्स डे उपक्रम सुरू केला. दरवर्षीप्रमाणे आज सांगलीत सोशल वर्कर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज कॉर्नर येथे हुतात्मा जवानांचा व्हॅलंटाईन्स डे साजरा केला गेला. तरुणांनी हुतात्मा जवानांना नतमस्तक होऊन अनोखा व्हॅलंटाईन्स डे साजरा केला. या उपक्रमास सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.