सांगली - कर्नाटक राज्यात जाणारे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडून ते सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात अडवण्यात आले. रघुनाथ पाटलांच्या शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले. ऊस दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली.
ऊसाला अधिकचा दर आणि एकरकमी एफआरपी या मागणीसाठी शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरली आहे. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात सुरू असलेली ऊस तोड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्या नेतृत्वाखाली बंद पडण्यात आल्या. या ठिकाणी असणारा ऊस हा शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी शुगर आणि साईप्रिया साखर कारखान्यात नेला जातो.