महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी शेखर इनामदार - BJP

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2020 मध्ये होणार आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पदवीधर संघातून आमदार निवडला जातो. गेल्या दोन निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून येत आहेत. पुढील वर्षी या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ, पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे.

शेखर इनामदार

By

Published : Jul 23, 2019, 6:52 PM IST

सांगली- पुणे पदवीधर मतदार संघाच्या भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी भाजपचे नेते शेखर इनामदार यांची निवड झाली आहे. 2020 मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडणार असून, या निवडणुकीसाठी प्रत्येक पदवीधरांनी नव्याने सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन शेखर इनामदार यांनी केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी शेखर इनामदार

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2020 मध्ये होणार आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पदवीधर संघातून आमदार निवडला जातो. गेल्या दोन निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून येत आहेत. पुढील वर्षी या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ, पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक जिल्ह्यासाठी भाजपकडून सदस्य नोंदणीसाठी जिल्हाध्यक्ष नेमण्यात आला आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून भाजपचे नेते व सांगली महापालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर भाजपमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी शेखर इनामदार यांनी बोलताना सांगितले की, एक वर्षाचा कालावधी सदस्य नोंदणीसाठी असून या कालावधीमध्ये सदस्य नोंदणीसाठी विविध पातळीवर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 26 जुलैपासून सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये प्रत्येक पदवीधर मतदाराने आपली नोंदणी करून घ्यावी, तसेच याआधी ज्या पदवीधरांनी मतदान केले आहे, त्यांनीसुद्धा आपली पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details