सांगली - देशात परिवर्तन व्हावं ही लोकभावना आहे. लोक भाजपला दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. देशाची सत्ता २ लोकांच्या हातात असल्याचे म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. तसेच राज्या-राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत, त्यांनी एकत्र यावे, अशी लोकभावना असल्याचेही पवार म्हणाले.
'देशाची सत्ता २ लोकांच्या हातात, परिवर्तन व्हावं ही तर लोकभावना'
भाजपला लोक दूर करण्याच्या प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. लोकांना बदल हवा आहे. मात्र, बदल लगेच घडणार नाही, पण राज्या राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत, त्यांनी एकत्र यावे, अशी लोकभावना पवारांनी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था आज खूप गंभीर आहे, ती सुधारेल असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.
देशातील अर्थव्यवस्था ही घसरलेली आहे. ती सुधारेल असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे दिल्लीचे नेते आमच्याशी बोलताना आजू-बाजूला कोण नाही, हे बघून बोलतात. त्यामुळे २ नेत्यांची पक्षात मोठी दहशत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पवारांनी टोला लगावला.
भाजपला लोक दूर करण्याच्या प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले. लोकांना बदल हवा आहे. मात्र, बदल लगेच घडणार नाही, पण राज्या राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत, त्यांनी एकत्र यावे, अशी लोकभावना पवारांनी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था आज खूप गंभीर आहे, ती सुधारेल असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.