महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Warkari Dindi Accident : भरधाव वेगात असलेला पिकअप घुसला दिंडीत, १६ वारकरी गंभीर जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापसी आणि माणगाव परिसरातील संत सदगुरू बाळू मामा दिंडी पंढरपूरकडे निघालेली असताना, या दिंडीला ( Warkari Dindi Accident ) मंगळवारी सायंकाळी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये 16 वारकरी जखमी झाले आहेत.

By

Published : Jul 6, 2022, 6:42 AM IST

Sangli Warkari Dindi Accident
दिंडीत भरधाव पिकअप जीप गाडी घुसन 16 वारकरी जखमी

सांगली - पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीत भरधाव पिकअप जीप गाडी घुसन 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. कवठेमहाकाळ तालुक्यातील मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे हा भीषण अपघात ( Sangli Warkari Dindi Accident ) घडला आहे. जखमी वारकऱ्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापसी आणि माणगाव परिसरातील संत सदगुरू बाळू मामा दिंडी पंढरपूरकडे निघालेली असताना, या दिंडीला मंगळवारी सायंकाळी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये 16 वारकरी जखमी झाले आहेत. छोटा टेम्पोसह सुमारे 50 ते 60 वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून आषाढी वारीसाठी जात असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी याठिकाणी पोहचले. पाठीमागून भरधाव आलेले पिकअप जीपचा गाडीवरील ताबा सुटल्याने पहिल्यांदा दिंडीच्या मागे असणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोला धडक दिली. नंतर जीपगाडी दिंडीत घुसली, आणि चालकाचा पूर्ण ताबा सुटल्याने पिकअप गाडी पलटी झाली.

दिंडीत भरधाव पिकअप जीप गाडी घुसन 16 वारकरी जखमी

त्यामुळे वारीतील 16 वारकरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी जखमी वारकरयांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये शंकर मारुती पाटील ( वय - 40 )बाळू पाटील ( वय -70 ) सखुबाई पाटील ( वय - 60 ) सखाबाई नारायण जाधव ( वय - 50 ) जकाबाई जाधव ( वय -50 ) हौसाबाई नाईकवाडी ( वय -70 ) अक्कताई पाटील ( वय - 55 ) सुरेश पाटील ( वय -50) आणि अक्कताई कांबळे ( वय - 50) व अन्य वारकरयांचा समावेश आहे. या घटनेनंतर पिकअप गाडी चालकाने पळ काढला आहे, तर सदर घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा -Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'बंडखोरांना पर्याय शोधण्याचे आदेश', लवकरच महाराष्ट्र दौरा

ABOUT THE AUTHOR

...view details