सांगली -कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील पूर पट्ट्यात येणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच जे लोक स्थलांतरित होणार नाहीत, त्यांची घरं सील करण्याचा इशारा पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. त्याच बरोबर पालिका प्रशासनाच्या वतीने कोणत्या भागात किती फूटांवर पाणी येऊ शकते आणि नागरिकांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरीत व्हायचे आहे, याबाबत पत्रक काढण्यात आले आहे.
स्थलांतरित व्हा...अन्यथा घरं सील करू, पालिकेचा पूर पट्ट्यातील नागरिकांना इशारा
कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील पूर पट्ट्यात येणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच जे लोक स्थलांतरित होणार नाहीत, त्यांची घरं सील करण्याचा इशारा पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
स्थलांतरीत व्हा..अन्यथा घरं सील करू, पालिकेचा पूर पट्ट्यातील नागरिकांना इशारा
पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या वतीने दत्तनगर, काका नगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमछ कॉलनी या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Last Updated : Aug 17, 2020, 2:29 PM IST