सांगली - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याज दराने ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्यात येणार आहे. वेळेत परतफेड न करणाऱ्यांना १२.५० टक्के भुर्दंड सोसावा लागणार आहे.
सांगलीच्या शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार पीक कर्ज - सांगली
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबर शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे जे शेतकरी पिककर्जाचे निर्धारित वेळेत परतफेड करणार नाहीत, त्यांना थकीत तारखेपासून १२.५० टक्के प्रमाणे व्याज सोसावे लागणार आहे.