सांगली - जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात यंदा धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाचे दोन गड काँग्रेस व राष्ट्रवादीने हिसकावून घेतले घेत भाजपाची घौडदौड रोखली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ज्या, जत मतदार संघात भाजपाचे पहिल्यांदा कमळ निवडून आले होते, त्याठिकाणी पराभव झाला आहे. 8 पैकी 2 जागांवर भाजपा आणि 1 जागेवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत यंदा भाजपाला धक्का बसला आहे. जत आणि शिराळा या दोन मतदार संघात भाजपाला हक्काच्या जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसेनेने खानापूरचा आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला आहे. 4 पैकी 2 जागावर भाजपाला विजय मिळवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ज्या मतदार संघात पहिल्यांदा भाजपाचा कमळ फुलले, त्या जत मतदार संघात काँग्रेसने भाजपाला यंदा धूळ चारली आहे. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी भाजपाचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव केला आहे.
शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांनी भाजपाचे आमदार शिवाजीराव नाईक यांचा पराभव केला आहे.
सांगली विधानसभा मतदार संघात यंदा अंतिम क्षणापर्यंत अटी-तटीची लढत पाहायला मिळाली.याठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव करत आपला गड शाबूत ठेवला आहे.
मिरज मतदार संघात भाजपाचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधला आहे.याठिकाणी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार बाळासाहेब व्होनमोरे यांचा पराभव केला आहे.
इस्लामपूर मतदार संघात जयंतराव पाटील यांनी आपला किल्ला शाबूत ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे.सलग 7 वेळा जयंतराव पाटील यांनी निर्विवाद विजय संपादन केले आहे.त्यांना शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि भाजपा बंडखोर निशिकांत पाटील यांचे आव्हान होते.
पलूस कडेगाव मतदार संघात कदम घराण्याची विजयाची परंपरा कॉंग्रेसचे विश्वजित कदम यांनी कायम राखली आहे. 1 लाख 62 हजार या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे.त्यांना शिवसेनेचे संजय विभूते यांचा पराभव केला आहे.
खानापूर मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी आपला गड कायम राखला आहे. याठिकाणी त्यांनी अपक्ष निवडणूक लढणाऱ्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा पराभव केला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ हा आर आर पाटलांचा बालेकिल्ला त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी अभेद्य ठेवला आहे.त्यांनी शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा पराभव केला आहे.
पाहूया प्रमुख लढतीत मिळालेली मत -
सांगली विधानसभा मतदार संघ
सुधीर गाडगीळ -भाजपा - 93636
पृथ्वीराज पाटील - काँग्रेस - 86697
भाजपा सुधीर गाडगीळ 6 हजार 939 मतांनी विजयी*
मिरज विधानसभा मतदार संघ.
सुरेश खाडे - भाजपा -: 96, 359
बाळासाहेब व्हानमोरे - स्वाभिमानी शेतकरी 65, 971
भाजपाचे सुरेश खाडे 30 हजार 398 मतांनी विजयी
तासगाव विधानसभा मतदार संघ.
सुमनताई पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस-: 1, 28371
अजितराव घोरपडे - शिवसेना -: 65, 839
राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील 62 हजार 532 विजयी
जत विधानसभा मतदार संघ