महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी - inc

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का  बसला आहे. शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

By

Published : Sep 15, 2019, 11:52 PM IST

सांगली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिराळ्यात पार पडलेल्या जनसंवाद मेळाव्यात हा त्यांनी हा निर्णय घेतला.

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

हेही वाचा - होर्डिंग लावून तिकीट मिळत नाही, काम पाहूनच तिकीट देणार - मुख्यमंत्री

शिराळा काँग्रेसचे नेते व माजी विधान परिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देत, सत्यजित देशमुख यांनी भाजपाची वाट धरली. काही महिन्यांपासून सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होते. चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. देशमुख यांनी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा घेऊन काँग्रेस पक्ष सोडत असल्याची भूमिका जाहीर केली. या मेळाव्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा - 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला

यावेळी सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आगपाखड करत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष! शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबावर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशी टीका सत्यजित देशमुख यांनी केली. सोमवारी सांगलीत दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसशी आतापर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख घरान्याने भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details