सांगली -राज्यावर ओढावलेले महापुराचे संकट दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शासकीय ध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
आपत्ती निवारणासाठी सरकार कटिबद्ध; पुरग्रस्तांना सर्वोतपरी मदत करणार - पालकमंत्री देशमुख - सांगली कोल्हापूर पूर
राज्यावर ओढावलेले महापुराचे संकट दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शासकीय ध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
पूरस्थिती असतानाही सांगलीमध्ये देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते शासकीय करण्यात आले. साध्या पध्दतीने हा शासकीय ध्वजारोहन सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. यावेळी, त्यांनी राज्यातील नागरिकांना अवाहन केले की, लोकांनी माणुसकीला जागत पुरग्रस्तांना मदत करावी. तसेच सरकारलाही काम करण्यासाठी सहकार्य करावे.