सांगली- गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सांगलीत काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. शहिदांना श्रद्धांजली वाहत, नक्षलवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याचा सांगलीत काँग्रेसकडून निषेध, हुतात्मा जवानांना वाहिली श्रद्धांजली - Gadchiroli Naxal attack
सांगली काँग्रेस कमिटीसमोर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेड्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भु-सूरंगात शहीद झालेल्या १६ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील
सांगली काँग्रेस कमिटीसमोर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेड्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भु-सूरंगात शहीद झालेल्या १६ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मेणबत्ती प्रज्वलित करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या नक्षलवाद्यांना सरकारने चोख उत्तर द्यावे, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केली आहे.