महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का ?; सत्तेची हौस कोणत्या जन्मात फिटणार?, सदाभाऊ खोतांची टीका - मराठा आरक्षण

शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का ? तसेच तुमच्या सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे ? अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीच्या केलेल्या मागणीवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे.

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar
Sadabhau Khot criticizes Sharad Pawar

By

Published : Aug 17, 2021, 5:10 PM IST

Updated : Aug 17, 2021, 5:28 PM IST

सांगली - शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का ? तसेच तुमच्या सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे ? अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीच्या केलेल्या मागणीवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

सत्तेची हौस कोणत्या जन्मात फिटणार ?

ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेमध्ये दुरुस्त करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. मात्र यावरून माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही कधीतरी खरं बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात, तसेच तुमच्या राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उगवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत
आधी एक आणि नंतर एक..
शरद पवार म्हणाले होते की, 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिला नाही, त्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात फेटाळला गेला, मात्र आता घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्हा आता परत केंद्राकडे का बोट दाखवता ?
तुमचे हात कोणी बांधले होते का ?
पहिल्यांदा ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा, मगच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल, मात्र तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवणार. मराठा समाज मागासलेला कसा आहे, याचा डेटा गोळा करावा लागेल आणि तो मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून गोळा करावा लागेल. पण हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार. त्याचबरोबर घटनेची दुरुस्ती तुम्ही केंद्रात आणि राज्यात साठ वर्षात सत्तेत होता, मग का केली नाही, तुमचे हात कोणी बांधले होते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे .
Last Updated : Aug 17, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details