महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर.आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांना कोरोनाचा संसर्ग - rohit patil corona positive

दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यासह त्यांचे चुलते सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तासगावमध्ये काल(बुधवार) झालेल्या कार्यक्रमात रोहित पाटील सहभागी झाले होते. यामुळे खळबळ उडाली आहे.

rohit patil
रोहित पाटील

By

Published : Sep 3, 2020, 8:58 PM IST

Updated : Sep 3, 2020, 10:04 PM IST

सांगली- दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रोहित पाटील हे काल(बुधवार) एका सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांची संपर्कात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहेत. रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी तिघांची तपासणी करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.

बुधवारी रोहित पाटील हे तासगाव मधील कोरोना हॉस्पिटल उद्घाटनासाठी हजर होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह शासकीय अधिकारी व नेतेही या कार्यक्रमास हजर होते. यामुळे शासकीय यंत्रणा हादरून गेली आहे. आबांचे पुत्र रोहित पाटील व त्यांच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Sep 3, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details