महाराष्ट्र

maharashtra

2 दिवसांत कृष्णेची पाणी पातळी साडेतीन फुटांनी  उतरली; पुन्हा युध्द पातळीवर बचावकार्य सुरू

By

Published : Aug 11, 2019, 9:57 AM IST

Updated : Aug 11, 2019, 11:04 AM IST

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. शनिवारपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोहचली होती.

कृष्णेची पाणी पातळी ओसल्याने  मदतकार्य वेगाने सुरू आहे.

सांगली- सहा दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेल्या कृष्णा काठची पाणी पातळी 2 दिवसांपासून हळूहळू उतरू लागली आहे. सांगलीमध्ये आज सकाळी 54.05 फुटांच्या खाली आता पाणीपातळी पोहोचलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरातील जवळपास अनेक भागातील पाणी पातळी १० ते २० फुटाने ओसरली आहे. तर अद्यापही पुरात नागरिक अडकले असून आता पुन्हा युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झालेले आहे.

2 दिवसांत कृष्णेची पाणी पातळी साडेतीन फुटांनी उतरली आहे.

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. शनिवारपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोहचली होती. सांगलीच्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी जवळपास साडेतीन फुटांहून अधिक उतरली आहे. दुसऱ्या बाजूला शहरात शिरलेले पाणी 10 ते 20 फुटाने ओसरले आहे.

महापूर हळूहळू ओसरत असला तरी दुसऱ्या बाजूला या महापुराच्या विळख्यात अद्यापही हजारो नागरिक अडकून आहेत. सांगली शहर, हरिपूर, सांगली वाडी, भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आदी नदीकाठच्या गावात नागरिक अडकून आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. तर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुद्धा पुरवण्यात येत आहेत.

आतापर्यंत जवळपास 1 लाख 70 हजारहून अधिक नागरिक व 45 हजारहून अधिक जनावरांचे प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आलेले आहे. तर पूर ओसरू लागल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर पाणी पातळी मध्ये हळूहळू घटत असल्याने शहरातला पुराचा विळखा थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे आज संध्याकाळपर्यंत आणखी कमी होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Last Updated : Aug 11, 2019, 11:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details