सांगली - सांगलीतील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील ४३ पैकी ३१ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. तर १२ जणांचे रिपोर्ट हे प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
इस्लामपूरचे २६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला सांगलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे. मात्र सांगली शहरातील विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तर त्या मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांना शोधून प्रशासनाने त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल केले होते, ज्यामध्ये मृत व्यक्तींच्या ५ जणांच्या कुटुंबाचाही समावेश होता. यामधील १५ जणांचे रिपोर्ट हे सोमवारी रात्री निगेटिव्ह आले होते आणि मंगळवारी सकाळी उर्वरित २८ जणांपैकी आणखी १६ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
सांगलीच्या कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील ४३ पैकी ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह.. कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश - सांगली बातमी
सांगलीतील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील ४३ पैकी ३१ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. तर १२ जणांचे रिपोर्ट हे प्रतीक्षेत आहेत
सांगलीच्या कोरोना मृत व्यक्तीच्या संपर्कातील ४३ पैकी ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
कोरोना मृत व्यक्तीच्या संपर्कातील ४३ पैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर १२ जणांचे अहवाल हे प्रतीक्षेत असल्याचे कोरोना नोडल अधिकारी डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे.