महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युद्धजन्य परिस्थितीत सरकार सोबत रहा, राजकारण करू नका - दानवे - pak conflict

युद्धजन्य परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष सरकार सोबत राहतात असा इतिहास सांगतो. त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन दानवे यांनी सांगली येथे केले.

रावसाहेब दानवे

By

Published : Feb 28, 2019, 11:55 PM IST

सांगली-एकीकडे सरकार सोबत आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे विरोध करायचे हा दुटप्पीपणा कोणी करू नये, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. युद्धजन्य परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष सरकार सोबत राहतात असा इतिहास सांगतो. त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन दानवे यांनी सांगली येथे केले.

देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. युद्धाच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या सोबत राहिले पाहिजे, या परिस्थितीत राजकारण करणे हे चुकीचे आहे. एकसंध होऊन संपूर्ण देश एक आहे, हे जगाला दाखवून दिले पाहिजे. त्यामुळे या परिस्थिती सरकार सोबत रहावे, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details