सांगली- बौद्ध धम्म हा मानवतेला आणि समतेला मजबूत करणारा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सांगलीच्या मिरजमध्ये आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
बौद्ध धम्म मानवतेला आणि समतेला मजबूत करणारा - रामदास आठवले
दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद सांगलीच्या मिरजेमध्ये भदंत राहुल बोधी महाथेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार, माजी महापौर विवेक कांबळे यांच्यासह बौद्ध धर्मिय धर्मगुरू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री रामदास आठवले यांनी या महापरिषदेमध्ये बोलताना सांगितलं की, 'बौद्ध धम्म हा मानवतेला आणि समतेला मजबूत करणारा आहे. तसेच व्यक्तीला वैचारिक पातळी देणारा आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्माने नेहमीच अंधश्रद्धेला विरोध केला आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. मलाही बौद्ध धम्म व भारतीय असल्याचा अभिमान आहे.'