महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण, राजेश टोपेंची माहिती

हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, 'राज्यात कोरोना स्थितीमध्ये अनेक खासगी डॉक्‍टराकडून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आयएमए यांच्यासोबत चर्चा करून राज्यातल्या सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना काळात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.'

rajesh tope declared insurance coverage for private doctors in maharashtra
आता खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण, राजेश टोपेंची माहिती

By

Published : Aug 17, 2020, 8:45 PM IST

सांगली - कोरोना स्थितीत राज्यातील खाजगी डॉक्टरांनासुद्धा आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच राज्यात आरोग्य विभागात 17 हजार जागा भरल्या जातील, अशी घोषणाही करत मास्क आणि सॅनिटायझर याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्चून हे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या अद्यावत हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळा आज (सोमवार) पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या रुग्णालयात ४० बेडचे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले असून १० बेडचे अतिदक्षता विभाग, २० बेडचा जनरल वॉर्ड आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत आणि खास सोई-सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.

हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, 'राज्यात कोरोना स्थितीमध्ये अनेक खासगी डॉक्‍टराकडून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आयएमए यांच्यासोबत चर्चा करून राज्यातल्या सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना काळात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.'

राजेश टोपे माहिती देताना...

जर एखादा डॉक्टर आरोग्य सेवा बाजवताना कोरोना बाधित होऊन मृत्यू झाल्यास त्या डॉक्टराला पन्नास लाख रुपये विमा मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर्सनी आता त्यांच्या सुरक्षेची काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. शिवाय राज्य शासन प्रत्येक डॉक्टर सोबत आहे. त्याच बरोबर कोरोना काळात जर एखादी हिंसक घटना डॉक्टरांसोबत घडल्यास नव्या कलमानुसार कारवाई करण्याच्या सूचना गृह खात्यामार्फत देण्यात आल्याची माहिती मंत्री टोपे यांनी देत डॉक्टरांनी आता सक्रिय व्हावे, असे आवाहन केले.

मास्क आणि सॅनिटायझर याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करण्याचा निर्णय ही घेण्यात आल्याचे माहिती मंत्री टोपे यांनी सांगितले. मास्क व सॅनिटायझर हे आता यापुढे गरजेचे असल्याने त्याचे दरही नियंत्रित आणले जाणार असून येत्या चार दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता राज्यातल्या आरोग्य विभागातील 17 हजार जागा मेरीटद्वारे भरण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री टोपे यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details