सांगली -देशभरात सध्या सावरकरांवरून राजकारण सुरू असून सर्वच राजकारणी सावरकरकरांचा सोईनुसार वापर करत आहेत. त्यांचे हिंदुत्व हे वैज्ञानिक दृष्टीने होते. त्यांनी गाय ही उपयुक्त पशु असून तिच्या पोटामध्ये ३३ कोटी देव असल्याची फक्त भाकड कथा असल्याचे सांगितले होते. असे असतानाही मागील सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा सुरू केला, असे विधान शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केले आहे.
रघुनाथ पाटलांची गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याची मागणी हेही वाचा -तासगावजवळ तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना सत्तेसाठी लाचार असल्याची टीका त्यांनी केली. पण त्यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना रात्रपाळीला कामाला लावून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेवून अजित पवारांना क्लीन चिट दिली होती ही लाचारी नव्हती का?, असा सवाल रघुनाथ पाटील यांनी केला आहे. तर सध्या सावरकरांबद्दल मागील सरकारला जास्तच प्रेम उफाळून येत आहे.
हेही वाचा -एनआरसीसह 'कॅब' कायदा रद्द करा; एमआयएमची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सावरकर यांना हा गोवंश हत्या कायदा अभिप्राय आहे का? या हत्या बंदीमध्ये गाई, होस्टन जातीची गाई, वळू, बैल यांचा समावेश करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. हे सावरकरांना अभिप्रेत होते का? फडणवीसांनी सोईनुसार प्रेम दाखवू नये असेही पाटील म्हणाले.. जर तुमचे सावरकरांवर खरेच प्रेम असेल तर हा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याची मागणी पाटील यांनी केली.