महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनआरसी, सीएए विरोधात शेवटपर्यंत लढा देऊ; दिल्लीतील नेत्यांचा सांगलीत निर्धार - राष्ट्रीय नागरिक नोंदणी

एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग या ठिकाणी महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतही गेल्या 34 दिवसांपासून स्टेशन चौक येथे वसंत बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि देशात लागू करण्यात येत असलेल्या सीएए, एनआरसी विरोधात जागृती आणि निर्धार करण्यासाठी दिल्लीतील शाहीनबाग आणि विविध आंदोलनातील नेत्यांनी शनिवारी सांगलीमध्ये उपस्थिती लावली.

Sangali
एनआरसी व सीएए विरोधात आंदोलन

By

Published : Feb 23, 2020, 8:29 PM IST

सांगली- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लादून जातियवाद पेरायचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा आरोप दिल्लीतील शाहीनबाग येथील प्रमुख नेत्यांनी केला आहे. तसेच एनआरसी व सीएए सोबत तुम्हालाही हटवू, असा इशारा भाजपला दिला. सांगलीमध्ये शाहीनबाग समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलना प्रसंगी ते बोलत होते.

एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग या ठिकाणी महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतही गेल्या 34 दिवसांपासून स्टेशन चौक येथे वसंत बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि देशात लागू करण्यात येत असलेल्या सीएए, एनआरसी विरोधात जागृती आणि निर्धार करण्यासाठी दिल्लीतील शाहीनबाग आणि विविध आंदोलनातील नेत्यांनी शनिवारी सांगलीमध्ये उपस्थिती लावली.

यामध्ये असोसिएशन ऑफ इंडियन मुस्लीम इंट्युलेक्युचअल निमंत्रक जियाउल हक, दिल्लीच्या जेएनयु आंदोलनाच्या प्रमुख अमृता पाठक, आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सचिव हसीना अहमद आणि दिल्ली विद्यापीठाच्या स्वाती खन्ना या प्रमुख उपस्थित होत्या. तसेच या सभेला सांगली जिल्ह्यातील मुस्लीम समाजाच्या महिलांसह इतर धर्मीय महिलांनाही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

सांगलीतील वसंत बाग

यावेळी आंदोलनातील महिलांना मार्गदर्शन करताना हके यांनी सांगितले की, दिल्लीतील शाहीनबागचे आंदोलन आज देशातील 1 हजार 136 गावांमध्ये सुरू आहे. त्यामुळे कायदे लादण्याचे मनसुबे रचणाऱ्या सरकारच्या कानापर्यंत आता हा आवाज पोहोचला आहे. तसेच संविधान मोडीत काढण्याचा सरकारचा डाव जनतेसमोर आला आहे. त्यामुळे संविधानाचे मूल्य अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई सुरू आहे, असे मत हक यांनी व्यक्त करत, एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत, देशातील मुस्लिम लावारिस पठानच्या मागे नाही, तर देशातल्या संविधानाच्या बाजूने आहेत, असे मत व्यक्त केले.

जेएनयु विद्यापीठच्या नेत्या अमृता पाठक म्हणाल्या की, सबका साथ, सबका विकास म्हणून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशाला उद्ध्वस्त केले आहे. आज डोनाल्ड ट्रम्पच्या स्वागतासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी मोदी सरकारने चालवली आहे. इतकेच नव्हे तर अहमदाबाद येथील गरिबी लपवण्यासाठी भिंत बांधली जात आहे. मात्र, अशा पद्धतीची तानाशाही चालू देणार नाही. त्याचबरोबर जनतेला एनआरसी आणि सीएएसाठी कागदपत्र मागणारे आणि देशभक्ती आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? असा सवाल पाठक यांनी उपस्थित केला.

आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सचिव हसीना अहमद म्हणाल्या, आसाममध्ये तर एनआरसी यापूर्वीच लागू केली आहे आणि एका रात्रीत नोटीस बजावली. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत कुटुंबांना सरकारी कार्यालयात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या. आज या कायद्यातंर्गत आसाममध्ये 6 ठिकाणी डीटेन्शन कॅम्प सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे नरेंद्र मोदी हे, एक ही डीटेन्शन कॅम्प आसाममध्ये सुरू नसल्याचे धडधडीत खोटे बोलत आहेत, असा आरोप हसीना अहमदने केला.

दिल्ली विद्यापीठाच्या आंदोलक नेत्या स्वाती खन्ना म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या कायद्यामुळे सर्व जाती-धर्म आज पेटून उठला आहे. त्याचे परिणाम सर्व धर्मीय महिला आज एकत्रित रस्त्यावर उतरून याचा निषेध नोंदवत आहेत. या देशातील नागरिक भगतसिंग महात्मा गांधी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारीस आहे आणि तो तुम्हाला पुरून उरेल. तसेच या देशात संविधान सगळ्यात मोठे आहे, स्वाती खन्ना यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details