सांगली- लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडत असून दहाव्या फेरी अखेर भाजपचे संजयकाका पाटील यांची आघाडी कायम आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष सुरू झाला आहे. दहाव्या फेरी अखेर संजयकाका पाटील यांनी १ लाख ११ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
संजयकाका पाटलांची आघाडी कायम, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू - सांगली
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून संजयकाका पाटील यांनी १ लाखांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या आघाडीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
जल्लोष
मतमोजणीच्या १८ फेऱ्या पार पडणार आहेत. मात्र आघाडी कायम असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालांची उधळण व आतषबाजी करत जल्लोष सुरू केला आहे. अद्याप ८ फेऱ्या बाकी असल्या, तरी प्रत्येक फेरीअंती संजयकाका पाटील यांच्या मताधिक्क्यांमध्ये वाढ होत असल्याने संजयकाका पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.