महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

जिल्ह्यात आज(रविवार) संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शिराळा, कवठे महांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यासह सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे, दिवसभर उकाड्याने हैरान झालेल्या जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

By

Published : May 31, 2020, 10:05 PM IST

सांगली - जिल्ह्यात आज(रविवार) सकाळपासूनच तापमानात वाढ होऊन उष्णतेने शरीराची लाही लाही होत असतानाच संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिवसभरातील उकाड्यापासून जिल्हावासियांना थोडा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आज(रविवार) संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शिराळा, कवठे महांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यासह सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे, दिवसभर उकाड्याने हैरान झालेल्या जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. सकाळपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला होता. यात सायंकाळनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार अशा पद्धतीने हा पाऊस पडला आहे. या मान्सून पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details