सांगली - नवरात्र उत्साहातील महाप्रसादाच्या अन्नातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील विजयनगर येथे घडली.
नवरात्रीचा महाप्रसाद खाल्ल्याने 31 जणांना विषबाधा; सांगलीच्या मिरज तालुक्यातील घटना
नवरात्रनिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात पाच बोकडांचा बळी देण्यात आला. या महाप्रसादाच्या अन्नातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील विजयनगर येथे घडली.
नवरात्रनिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात पाच बोकडांचा बळी देण्यात आला. बोकड्यांना मंगळावारी शिजवून त्याचे महाप्रसाद म्हणून भोजन करण्यात आले. महाप्रसादाचे भोजन लहान मुले, मली, पुरुष मंडळी आणि महिलांनी केले. मात्र काही वेळातच त्यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. त्यामुळे या सर्वांना तातडीने मिरज येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाप्रसादासाठी तयार केलेल्या मांसाहारी भोजनातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाला. मंगळवारी सायंकाळी उपचार करुन सर्व रुग्णांना घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.