महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! सांगलीच्या बाजारात चक्क प्लास्टिकची अंडी; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई - shop

शिजलेली अंडी कधीही पाण्यावर तरंगत नाहीत किंवा पाण्याला फेस येत नाही. त्यामुळे साठे घाबरल्या आणि त्यांनी पतीला ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर साठे यांनी आपल्या काही मित्रांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी ५ अंडी आणली आणि त्यातील चार अंडी शिजवून पहिली. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडला.

सांगलीच्या बाजारात प्लॅस्टिकची अंडी

By

Published : Jun 5, 2019, 7:57 PM IST

सांगली - प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची चर्चा काही महिन्यापासून सुरू असतानाच सांगलीच्या बाजारात नकली अंडी सापडली आहेत. त्यामुळे नकली अंड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधगावमध्ये एका दुकानात ही अंडी आढळली असून या प्रकरणी अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून प्लास्टिकची सर्व अंडी ताब्यात घेतली आहेत.

सांगलीच्या बुधगावमधील युवराज साठे यांनी रात्रीच्या जेवणासाठी अंड्यांचा बेत आखला होता. यासाठी त्यांच्या लहान मुलाने गल्लीतीलच भाकरे किराणा स्टोअर्समधून ६ अंडी विकत आणली होती. त्यानंतर साठे यांच्या पत्नीने ती अंडी शिजवण्यासाठी पातेल्यात टाकून गॅसवर ठेवली. काही वेळातच पाणी गरम झाले आणि त्यामधील अंडी फुटून पाण्यावरती तरंगू लागली आणि त्या पाण्याला पांढरा फेस येऊ लागला.

सांगलीच्या बाजारात प्लास्टिकची अंडी

शिजलेली अंडी कधीही पाण्यावर तरंगत नाहीत किंवा पाण्याला फेस येत नाही. त्यामुळे साठे घाबरल्या आणि त्यांनी पतीला ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर साठे यांनी आपल्या काही मित्रांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी पाच अंडी आणली आणि त्यातील चार अंडी शिजवून पहिली. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडला. पाणी जसे गरम होईल, तशी अंडी फुटू लागली आणि पाण्यावरती तरंगू लागली. त्यानंतर पाण्यातून अंडे बाहेर काढून त्याचे कवच जाळले असता, ते प्लास्टिकसारखे जळू लागले आणि त्याचा वास देखील येऊ लागला.
त्यानंतर साठे यांनी एक कच्चे अंडे फोडून वाटीमध्ये ओतले असता, त्याच्या आतील पांढरा आणि पिवळा बलक वाटीमध्ये एकरूप झाला. वास्तविक खऱ्या अंड्यामध्ये तसे होत नाही. या बाबत भाकरे किराणा स्टोअर्सच्या मालकास विचारणा केली. त्यावर आपण ही अंडी एका विक्रेत्याकडून आणल्याचे सांगितले. याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करत ही अंडी नकली व बनावट असल्याचा दावा साठे यांनी केला आहे. यानंतर अन्न औषध प्रशासनाने बुधगावमधील दुकानदार भाकरे यांच्या घरातील अंड्याची तपासणी करत अंड्याच्या साठा ताब्यात घेतला आहे. त्यानंतर ही अंडी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, या प्रकारामुळे नकली अंड्यांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून तपासणीनंतर हे सर्व अंडी खरेच नकली आहेत का? हे समोर येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details