महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Politics On Shivaji Maharaj Statue छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकारण, आष्टा शहरात 8 दिवसात दोनदा रातोरात प्रतिष्ठापणा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन ( People Set Up Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) चांगलेच राजकारण रंगले आहे. नागरिकांनी बसवलेला पुतळा प्रशासनाने हटवल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यात आता पुन्हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ( Politics On Shivaji Maharaj Statue In Ashta City ) रातोरात बसवण्यात आला आहे. त्यामुळे आष्टा शहरात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ( Shivaji Maharaj Statue ) लावण्यात आला असून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा

By

Published : Jan 3, 2023, 1:05 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना

सांगली - पुन्हा एकदा आष्टा शहरात अवघ्या आठ दिवसात दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( People Set Up Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) रातोरात बसवण्यात आला आहे. आष्टा शहरातील शिवप्रेमींनी दुसऱ्यांदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ( Shivaji Maharaj Statue ) शहरामध्ये प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्यांदा शहरामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना ( Politics On Shivaji Maharaj Statue In Ashta City ) करण्यात आली. आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेच्या घडलेल्या घटनेने प्रशासन पुन्हा चक्रावून गेले आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून राजकारणआष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून राजकारण रंगले आहे. आष्टा शहरात 8 दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीत बसवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुतळ्याच्या जागेला मंजुरी मिळत नसल्याने रात्रीत पुतळा बसवला जात आहे. याआधी अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आष्टा पालिकेत ठराव झाला होता. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी ही झाली होती. मात्र अद्याप जागेला मंजुरी मिळाली नसल्याने आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी पहिल्यांदा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र तो पुतळा हटवल्यानंतर आता दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींकडून अन्य ठिकाणी बसवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आला पुतळा25 डिसेंबर रोजी ठाकरे गट-राष्ट्रवादीकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दत्त मंदिरासमोर रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र याला कोणतीही परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या सूचनेनंतर काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आला. यानंतर आष्ट्यातल्या समस्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Maharaj Statue In Ashta City ) पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केले. मात्र प्रशासनाकडून जागा देण्याचे फक्त आश्वासन देण्यात आले.

मुख्य चौकात 12 फुटी अश्वारूढ पुतळाआता पुन्हा आष्टा शहरामध्ये रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तब्बल 12 फुटी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आष्टा शहरातील मुख्य चौकात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एका रात्रीमध्येच हा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. याची कोणतीच चाहूल पोलीस प्रशासनाला लागली नाही. भाजपाकडून हा पुतळा बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान या पुतळ्याच्या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 144 कलम देखील लागू करण्यात आलेले आहे. मात्र समस्त शिवप्रेमींनी या ठिकाणी महाआरती करण्याचे नियोजन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details