महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

EXCLUSIVE VIDEO:कृष्णा-वारणेच्या पुराचे ड्रोनच्या नजरेतून विहंगम दृश्ये - sky

कृष्णां नदीकाठचा परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. हरिपूर येथील वारणा आणि कृष्णा नद्यांचा संगमाच्या ठिकाणी हे दोन्ही नद्यांचे पात्र नजरेत मावत नाही. दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा आणि वारणा नद्यांचे ड्रोन कॅमेरातून चित्रीकरण करण्यात आले आहे.

EXCLUSIVE VIDEO:कृष्णा-वारणेच्या पुराचे ड्रोनच्या नजरेतून विहंगम दृश्ये

By

Published : Aug 2, 2019, 12:01 PM IST

सांगली -जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना सध्या पूर आला आहे. त्यामुळे या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडल्यात आणि अक्राळ-विक्राळ असे रूप या नद्यांनी धारण केले आहे. याच पुराचे विहंगम दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपण्यात आले आहेत.

कृष्णा-वारणेच्या पुराचे ड्रोनच्या नजरेतून विहंगम दृश्ये

सांगलीच्या कृष्णा आणि वारणा पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीतील कृष्णेची पातळी पस्तीस फुटांवर पोहोचली आहे. दुसऱ्या बाजूला वारणा नदी ही पात्राबाहेर पडली आहे. दोन्ही नद्यांचे पात्र विस्तीर्ण झालाय. त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. याशिवाय नदी काठच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी देखील शिरलं आहे.

कृष्णा नदीकाठचा परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. हरीपूर येथील वारणा आणि कृष्णा नद्यांचा संगमाच्या ठिकाणी हे दोन्ही नद्यांचे पात्र नजरेत मावत नाही. दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा आणि वारणा नद्यांचे ड्रोन कॅमेरातून चित्रीकरण करण्यात आले आहे. सांगलीतील आयर्विन ब्रिज परिसरातील कृष्णा नदीची विहंगम दृश्ये टिपण्यात आली आहेत. त्याचबरोबर कृष्णा आणि वारणा संगमाची ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली असून अक्राळ-विक्राळ रूप पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details