महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून पतीकडून प्रियकराची हत्या; सांगलीतील घटना - sangli crime

सांगलीच्या मीरा हौसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असणाऱ्या तात्यासाहेब मळ्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही खुनाची घटना उघडकीस आली.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 21, 2019, 11:57 PM IST

सांगली- पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून पतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना शनिवारी सांगलीमध्ये घडली. गणेश रजपूत (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस संशयीत पतीचा शोध घेत आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.

पोलीस घटास्थळी भेट देताना

सांगलीच्या मीरा हौसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असणाऱ्या तात्यासाहेब मळ्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही खुनाची घटना उघडकीस आली. या खून प्रकरणी एका रिक्षा चालकाचे नाव समोर आला आहे. मृत गणेश रजपुत आणि संशयित रिक्षा चालकामध्ये मैत्री होती. त्यातून गणेश याचे रिक्षाचालकाच्या घरी येणे-जाणे असल्याने गणेश याचे रिक्षा चालकाच्या पत्नी सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यातून गणेश यांने रिक्षा चालकाच्या पत्नीला पळवून नेल्याचा प्रकार घडला होता.

या घटनेनंतर रिक्षा चालक हा गणेश राजपूत ययाच्यावर चिडून होता. या प्रकारानंतर गणेश सदर महिलेसोबत अन्यत्र राहत होता. गुरुवारी गणेश काही कामानिमित्त सांगलीमध्ये आला होता. त्यावेळी तो त्याच्या घरी आला असल्याची माहिती संशयित रिक्षाचालकाला मिळाली. यानंतर शुक्रवारी सकाळच्या सुमारास रिक्षा चालकाने आपल्या एका मित्रासोबत गणेशला मीरा हौसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असणाऱ्या तात्यासाहेब मळा येथील एका निर्जन पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे त्याचे हात बांधून डोक्यात काठ्यांनी मारहाण करून खून केला.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. खुनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर पसार झालेल्या संशयित रिक्षा चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details