महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत ९ कोरोनाबाधितांची नोंद, एकाच घरातील चौघांना लागण - sangali corona patient

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन जण मुंबईहून आलेले आहेत. तर इतर मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले आहेत.

sangali corona update
सांगलीत ९ कोरोनाबाधितांची नोंद, एकाच घरातील चौघांना लागण

By

Published : Jun 1, 2020, 10:16 PM IST

सांगली- जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे आणखी नवे ९ रुग्ण आढळले आहेत. यातील काही रुग्ण मुंबईतून आले आहेत. तर काही मुंबईहून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. यामध्ये एकाच घरातील चौघांचा समावेश आहे. दरम्यान, आज दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन जण मुंबईहून आलेले आहेत. तर इतर मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातल्या मणदूर येथील मुंबईहुन आलेल्या एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकाच घरातील चौघांना लागण झाली आहे. ज्यामध्ये एक ४५ वर्षाचा पुरुष , ३८ वर्षांची महिला, २१ वर्षाचा मुलगा, आणि १८ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील दोघांना लागण झाली आहे, यामध्ये कोरोना बाधित व्यक्तीच्या ५१ वर्षीय पत्नी आणि २५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर शिराळा तालुक्यातील रिळे येथील ४८ वर्षाचा पुरुष, आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील ३९ वर्षाचा पुरुष आणि जत तालुक्यातील औंढी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकाला लागण झाली आहे.

तसेच दोन बाधित रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना मिरजेच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात आले आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती -

उपचार सुरू असलेले रुग्ण - ५२

आजपर्यंत बरे झालेले रुग्ण- ६५

एकूण मृतांची संख्या - ४

आजतागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १२१

पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण - ४

ABOUT THE AUTHOR

...view details