आगामी विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना निलेश राणे सांगलीNilesh Rane On Assembly Election :भाजपाचे युवा नेते सम्राट महाडिक यांच्याकडून बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीच्या उद्घाटनासाठी भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. भाजपाचे युवा नेता सम्राट महाडिक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी शर्यतीच्या नियोजनावरून बोलताना निलेश राणे यांनी सम्राट महाडिक यांचं कौतुक केलं. (Assembly Election 2024)
जनतेच्या भावनांची जाणीव हवी :माजी खासदार राणे म्हणाले, मतदारसंघामध्ये लोकांच्यासाठी काय करावं लागतं त्याची जाणीव पाहिजे आणि लोकांसाठी लढणारं नेतृत्वही लागतं. सम्राट महाडिक यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं चित्र उभं केलं आहे, ते खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. आता 2024 ला विधानसभा निवडणुका असणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्या सोबत सम्राट महाडिक 2024 चं विधिमंडळ बघणार म्हणजे बघणारच, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे निलेश राणे हे आता आमदारकी लढवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
निलेश राणेंची नाराजी दूर :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र तसंच माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य करुन राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यामुळे भाजपामध्ये राजकीय भूकंप झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईत सागर येथील निवासस्थानी 25 ऑक्टोबरला मंत्री रवींद्र चव्हाण तसंच निलेश राणे यांची भेट झाली होती. त्यानंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाल्याची पुन्हा एकदा बातमी आली होती. त्यानंतर आता निलेश राणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन थेट विधिमंडळात बसण्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर ते विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढतील याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आता लागणार हे निश्चित आहे.
हेही वाचा:
- लोकसभा निवडणूक २०२४ : पुढील पंधरा दिवसात महाविकास आघाडीत कोण कुठून लढणार ते स्पष्ट होईल - सुप्रिया सुळे
- सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली
- दुर्मीळ वृक्ष संवर्धनासाठी परतवाड्यात सुरू झाली 'सीडबँक'