महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : आणखी ७ नव्या कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा झाला १८९ - सांगली कोरोना रुग्ण

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ कायम आहे. बुधवारी दुपारपर्यंत यामध्ये आणखी सात नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईहून आलेल्या आणि मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सांगली कोरोना
सांगली कोरोना

By

Published : Jun 10, 2020, 4:58 PM IST

सांगली - जिल्ह्यात आणखी ७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या ७८ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण १८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १०४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ कायम आहे. बुधवारी दुपारपर्यंत यामध्ये आणखी सात नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईहून आलेल्या आणि मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील एकाच गावातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एक १७ वर्षीय मुलगा, १६ वर्षीय मुलगी, ३८ आणि ४० वर्षीय पुरुष, तर मांगले येथील ११ वर्षीय मुलगा, यांचा समावेश आहे. तसेच पलूस तालुक्यातील कुंडल येथील ५५ वर्षीय पुरुष, कडेगाव तालुक्यातील ६९ वर्षीय वृद्धालाही कोरोना लागण झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी दुपारपर्यंत सात रुग्णांची भर पडल्याने सांगली जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. तर आतापर्यंत १८९ रुग्णांची नोंद जिल्ह्यामध्ये झाली आहे. त्यापैकी १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत आणि सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details